नदीत बुडून युवकाचा मृत्यू.

नदीत बुडून  युवकाचा मृत्यू.


   पोंभुर्णा : रंगोत्सवाचा गुलाल उधळून नदीवर आंघोळीला गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल दिनांक  १० ला दुपारी  2 वाजता चे सुमारास घडली.मृतकाचे नाव अखिल दिवाकर कामीडवार वय २७ असे आहे. ते  पोंभूर्णा तालुक्यातील कवठी येथील मुळचे रहिवासी असून मागील काही दिवसांपासून ते पोंभूर्णा येथे किरायाच्या घरात रहात होते. आज धुळवड साजरी करुन अखिल आपल्या काही मित्रांसह येथील अंधारी नदीपात्रात ( भिमकुंड जवळ) आंघोळीला गेला होता.खोल पाण्याचा अंदाज न अाल्याने बुडून मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई-वडील व बहिण आहे. मागील काहि वर्षापासून ते पोंभुर्णा येथे राहात आहेत.आई खाजगी काॕन्व्हेंट मध्ये शिक्षिका तर वडील खाजगी नौकरीवर आहेत.अखिल  हा बि.ई.पुर्ण करुन नागपुरला खाजगी कंपनीत नौकरीला होता.तरुण कमावता मुलाच्या आकस्मिक मृत्यूने आई वडिलांवर दुखाःचे कुराड कोसळले आहे.अखिल च्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.पोंभुर्णा  पोलीसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असुन मर्ग दाखल केला आहे. अधिक तपास ठाणेदार नाईकवाड यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

Post a Comment

0 Comments