चंद्रपूरच्‍या सैनिकी शाळेसाठी 76 कोटी रू. निधीची तरतूद

*चंद्रपूरच्‍या सैनिकी शाळेसाठी 76 कोटी रू. निधीची तरतूद*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांचे फलीत*

माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने चंद्रपूर जिल्‍हयात चंद्रपूर-बल्‍लारपूर मार्गावरील देशातील 29 व्‍या सैनिकी शाळेसाठी रू. 76 कोटी रू. निधीची तरतूद सन 2019-20 च्‍या पुरवणी मागण्‍यांद्वारे करण्‍यात आली आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मंत्रीपदाच्‍या कार्यकाळातील हा अतिशय महत्‍वपूर्ण प्रकल्‍प समजला जातो.

कारगील युध्‍दात महत्‍वपूर्ण भुमीका बजावणारे लेफ्टनंट जनरल आर. आर. निंभोरकर यांच्‍या प्रेरणेतुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या सैनिकी शाळेची मुहूर्तमेढ चंद्रपूर जिल्‍हयात रोवली. या सैनिकी शाळेचे बहुतांश बांधकाम विक्रमी वेळेत अर्थात 14 महिन्‍यात पूर्ण झाले व सैनिकी शाळा कार्यान्‍वीतही झाली.  या सैनिकी शाळेच्‍या उर्वरित बांधकामासाठी 76 कोटी रू. निधीची तरतूद नुकत्‍याच पार पडलेल्‍या विधीमंडळाच्‍या अधिवेशनात पुरवणी मागण्‍यांद्वारे करण्‍यात आली आहे. आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने नुकताच सदर सैनिकी शाळेत मुलींना वर्ग सहावी करिता प्रवेश देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेण्‍यात आला आहे. सैनिकी शाळेत मुलींना प्रवेश देण्‍याचा हा निर्णय देशातील फक्‍त दोन शाळांकरिताच घेण्‍यात आला असून महाराष्‍ट्रात चंद्रपूर जिल्‍हयातील सैनिक शाळेसाठी हा निर्णय घेण्‍यात आला आहे.

चंद्रपूरची सैनिकी शाळा हे आपले स्‍वप्‍न होते, ही सैनिकी शाळा कार्यान्‍वीत झाल्‍याने स्‍वप्‍नपुर्तीचा आनंद तर मिळालाच मात्र जेव्‍हा या शाळेतला विद्यार्थी 20-25 वर्षानंतर देशाच्‍या आर्मी दलाचा, नेव्‍ही दलाचा प्रमुख असेल किंवा एअरफोर्समध्‍ये महत्‍वाच्‍या पदावर असेल तेव्‍हा हा आनंद द्विगुणीत होईल. जेव्‍हा हा अधिकारी सांगेल की होय मी चंद्रपूरच्‍या सैनिकी शाळेचा विद्यार्थी आहे तेव्‍हा मिळणारे समाधान फार मोठे असेल, अशी भावना आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. 

Post a Comment

0 Comments