अवैध रित्या अमली पदार्थ गांजाची वाहतुक करणारे इसमाविरुध्द कारवाई, एकुण १,६२,३२०/- रु. चा माल जप्त
◾एकुण ३ किलो ११६ ग्रॅम गांजा सदृष्य अमली पदार्थासह एक मोटार सायकल, दोन मोबाईल
◾असा एकुण १,६२,३२०/- रु. चा माल जप्त,पोलीस स्टेशन भद्रावती ची कामगिरी
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भद्रावती पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोस्टे भद्रावती हद्दीत मानोरा फाटा येथे नाकाबंदी करुन खबरेप्रमाणे एक होन्डा शाईन मोटार सायकल क्र. एम.एच.४०-सीएन-३९६६ ला थांबवुन चालक नामे हर्षल राजेंद्र रक्षीत वय २४ वर्ष रा. काटोल पंचशील नगर नागपूर व मागे बसलेला इसम नामे अंशुमन रविंद्र विर वय २४ वर्ष रा. येनवा ता. काटोल नागपूर यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन बॅगची पाहणी केली असता त्यात गांजा सदृश्य वनस्पती अमली पदार्थ एकुण ३ किलो ११६ ग्रॅम किं. ६२,३०२/-रुपयाचा माल अवैधरित्या वाहतुक करीत असल्याचे मिळुन आल्याने सदर इसमाचे ताब्यातील वर नमुद मोटार सायकल आणि त्याचेकडील दोन नग मोबाईल असा एकुण १,६२,३२०/- रुपयाचा माल जप्त करुन आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन भद्रावती येथे गुन्हा नोंदविण्यात आला येवुन पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी श्री. मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री. ईश्वर कातकडे - अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर आणि श्री. संतोष बाकल, उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. योगेश पारधी यांचे नेतृत्वात सपोनि श्री. संजय मिश्रा, सपोनि श्री. मोहन धोंगडे, पोउपनि श्री. संतोष केदार, गुन्हे शोध पथकातील पोउपनि श्री. गजानन तुपकर, श्री. महेंद्र बेसरकर, पोहवा गोपाल आतकुलवार, पोअं जगदिश झाडे, धर्मराज मुंडे, संतोष राठोड, खुशाल कावळे, योगेश घाटोडे, कोमल मोहजे यांनी केली आहे.






0 Comments