बल्लारपूर येथे मन्नेवार समाजाचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

 



बल्लारपूर येथे मन्नेवार समाजाचा हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न

◾हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले

 ◾नवनिर्वाचित नगरसेविका यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार


मन्नेवार समाजाच्या विडियो 

बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर शहरात मन्नेवार समाजाच्या वतीने राणी लक्ष्मी वार्ड येथील दुर्गा माता मंदिरात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात दुर्गा माता मंदिरात पुज्या-अर्चा करून करण्यात आली. यावेळी समाजाच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. करुणा न. रेब्बावार ला शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 कार्यक्रमात समाजातील बहुसंख्य महिला  मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महिलांना हळदी-कुंकू लावून वानाचे वाटप करण्यात आले. तसेच या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे ही आयोजन करण्यात आले होते. समाजातील महिलांनी यात हिरहीरीने भाग घेतला .

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दुर्गाराज आरेकर, कैलास भिमन्नवार, रामू मेदरवार, विनोद बंदेला, शांतीकुमार गिरमिल्ला, कार्तिक बोगले, प्रसाद पुल्लीवार, संतोष बोगले, मल्लेश मामडी, व्यंकट स्वामी यलमुला तसेच मन्नेवार समाज कमिटीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments