श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये दहीहांडी उत्सवाचे आयोजन

 




श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये दहीहांडी उत्सवाचे आयोजन

◾संघर्ष युवा विकास मंडळ, साखरीचा स्तुत्य उपक्रम;सलग 25 व्या वर्षी दहीहांडी उत्सव

चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : राजुरा तालुक्यातील क्रिडा, सामाजिक, शैक्षणिक, कृषी व आरोग्य क्षेत्रात मागील 25 वर्षांपासून कार्यरत संघर्ष युवा विकास मंडळ, साखरीच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त स्थानिक हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये दहीहांडी उत्सवाचे आयोजन दि. 16 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले. यावेळी भजन दिंडीसह अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या आयोजनात 4 थरांच्या मनोऱ्याद्वारे मंडळाच्या युवा व अनुभवी गोविंदा पथकाने सुनियोजित पध्दतीने दहीहांडी फोडून उत्सव साजरा केला.

      कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाचे अध्यक्ष राजु घरोटे यांच्या मार्गदर्शनात अॅड. प्रशांत घरोटे, सुदर्शन बोबडे, मिथून काटवले, आनंदराव गोरे, संतोष उरकुडे, वसंता बोबडे, चंद्रशेखर कावळे, सुरज गोरे, अनिल गोरे, अमित निमकर, रामकिसन ताजने, दुर्गेश्वर लांडे व मंडळाचे सर्व पदाधिकारी गोविंदा पथकातील युवक आणि साखरी येथील श्रीकृष्ण भक्तांनी विशेष परिश्रम घेतले. या दहीहांडी कार्यक्रमास साखरी येथील महिला, पुरूष व आबाल वृध्द बहुसंख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments