शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

 




शांताराम पोटदुखे विधी महाविद्यलयात 79वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चंद्रपुर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथे १५ ऑगस्ट 2025 रोजी, स्वातंत्र्याची 78 वर्षे पूर्ण झाल्या च्या  निमित्ताने अमृत महोत्सव आनंदाने साजरा करण्यात आला. 

विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण महाविद्यलयात करण्यात आले.या प्रसंगी एल एल बी तिनं वर्षीय अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. अभय बुटले, बी ए एल एल बी अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा आवळे, पदवीतर विभाग प्रमुख प्रा. डॉ. पंकज काकडे, सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

महाविद्यालया चे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी कार्यक्रमा च्या आयोजना साठी अथक परिश्रम घेतले.या प्रसंगी  विधी महाविद्यालयात ध्वजारोहण आणि ध्वज वंदन करण्यात आले. महाविद्यालया चे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी सर्वाना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा  प्रदान केल्या आणि आज च्या तरुण पिढी ने भारताच्या स्वातंत्र्य सेनानी यांच्या बलिदाना ची जाण ठेवण्याचे आवाहन केले.

आज या आधुनिक युगात  कायद्याचे ज्ञान घेणाऱ्या विध्यार्थ्यानी संविधानिक अधिकार या विषयी जागरूकता निर्माण करावी असे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख यांनी आव्हान केले.या प्रसंगी शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना तरुणांनी 2047 च्या विकसित भारत या संकल्पने चा पुरस्कार करावा असे आवाहन केले. विधी महाविद्यालयात मेरी माटी मेरा देश तसेच हर घर तिरंगा या कार्यक्रमा च्या आयोजना सोबतच तिन दिवासीय ध्वजारोहण देखील करण्यात आले.कार्यक्रमाला विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.




Post a Comment

0 Comments