मनसे कामगार सेनेकडून डालमिया कंपनीच्या 30 कामगारांना मिळाला न्याय
◾मागील एक महिन्यापासून कामावरून कमी केल्याने 30 कामगार बसले होते घरी.
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठया प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंव्हा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला आणि सुरुवातीला तीन कामगारांना कामावरून कमी करण्यात आले.
मात्र त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की तें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या यूनियन मध्ये दाखल झाले. या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते पण शेवटी दिनांक 7 जुलै ला कंपनी चे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनी मधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला.
या वेळी मनसे कामगार सेनेकडून ॲड. कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष ॲड. अजित पांडे यांनी कामगारांच्या मुळ मागण्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडली. यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चिअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते, दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्या संदर्भात लवकरच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहे.













0 Comments