कोरोनाविषयी नागरिक खरच गंभीर आहेत काय ?
लॉकडाउन चे नागरिक पालन करतात का ?
बल्लारपुर(राज्य रिपोर्टर)दिपक भगत : - चीन च्या वुहान प्रांतातुन सुरु झालेला कोरोना हा विषाणुजन्य आजाराच्या रोगाने जगभर पाय पसरायला सुरुवात केली आहे चीन सह जगाच्या अनेक भागात अनेक निष्पाप नागरिकांना आपल्या प्राणाला ही मुकावे लागले याशिवाय भारतात कोरोना यौद्धे म्हणून सेवा देत असलेल्या वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, पोलिस बांधव यानाही कोरोना या विषाणुजन्य आजाराने ग्रासले आहे अवघ्या महाराष्ट्राचा विचार केला तर संपूर्ण राज्यात जवळपास 1300 च्या वर पोलिस बांधवाना कोरोना या आजाराने ग्रसित आहे म्हणजे जे पोलिस बांधव सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लागण होवू नये याकरिता सतत सेवा देत असताना सुध्दा आपण नागरिक या कोरोना आजाराविषयी किती गंभीर आहोत शासन आपल्याला कोरोना पासून बचाव साठी वारंवार घरी राहण्याचे आवाहन करीत असतांना सुध्दा आपण नागरिक क्षुल्लक कामासाठी बाहेर फिरताना आढळून येतो जवळपास मागील 22 मार्चपासुन देशभरात लॉकडाउन घोषित असून या काळात 5 पेक्षा अधिक नागरिक गोळा होवू नये असे निर्देश असतांना सुध्दा आपण नागरिक बाजारपेठेत तर इतकी तूफान गर्दी करतो की जणू काही आजच बाजारातील सर्व माल विकला जाईल. महाराष्ट्र शासनाने 31 मे 2020 पर्यत राज्यात लॉक डाउन घोषित केले असले तरी खरच राज्यात लॉकडाउन अस्तित्वात आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे या लॉकडाउन च्या काळात अनेक ठिकाणी 10 ते 5 च्या दरम्यान विविध आस्थापना सुरु ठेवन्याचे आदेश असले तरी सर्रासपणे काही आस्थापने सुरु असल्याचे निदर्शनास येते, याशिवाय सायंकाळी 7:00 ते सकाळी 7:00 पर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचे आदेश आहेत याकाळात ही अनेक नागरिक विनाकारनाने दुचाकी, चारचाकी वाहनाने फिरताना दिसून येतात शिवाय गप्पा गोष्टीनचे फड़ रंगलेले दिसून येतात यामुळेच नागरिक खरच कोरोना विषयी गंभीर आहेत का असा प्रश्न निर्माण होतो शासन प्रशासन आपल्या आरोग्यविषयी गंभीर असले तरी आपण किती गंभीर आहोत हा सुध्दा महत्वाचा प्रश्न आहे नेहमी शासन प्रशासन आपल्या मागे कोरोना सबंधात उभे राहील का? आपल्या परिसरात कोरोनाच्या जनजागृति साठी शासनाचे पथक आले की काही काळापुरते नागरिक घरी जातात व पथक गेल्यावर परिस्थिति जैसे थे असल्याचे चित्र दिसते यामुळे आपण नागरिक कोरोनाविषयी किती गंभीर आहोत हा प्रश्न निर्माण होत आहे.
चंद्रपुर जिल्ह्याचा विचार केला तर मे महिन्याच्या सुरूवातिपासन कोरोनाचे रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली आहे शासन प्रशासन युध्द पातळीवर कोरोनाशी लढाई करत आहे सद्यस्थितित चंद्रपुर जिल्ह्यात 21 कोरोनाबाधित असल्याची नोंद आहे मा.जिल्हाधिकारी व मा.पालकमंत्री जनतेला माहिती देताना रेडझोंन किंवा कंटेन्मेंट झोन येथून परजिल्हा किंवा परराज्यातुन येणाऱ्या नागरिकांना संस्थात्मक विलगिकरनात राहण्याचे आवाहन करीत असताना सुध्दा काही राजकीय पक्षाचे नेते राजकीय हस्तक्षेप करून काही भागात बाहेरुन आलेल्या नागरिकांना होम क़्वारण्टाइन करण्यावर भर देत आहे यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवू नये म्हणून बाहेरुन आलेले किंवा रेडझोंन व कंटेन्मेंट झोन मधून आलेले नागरिकांना संस्थात्मक विलगिकरनावर भर द्यावा शिवाय काही नागरिक होम क़्वारण्टाइन असतांना सुध्दा विनाकारण बाहेर फिरताना आढळून आल्यास प्रत्येक जबाबदार नागरिकांनी यांची सूचना प्रशासनाला द्यावी तसेच होम क़्वारण्टाइन असलेले नागरिक सूचनांचे पालन करण्यास चुकत असल्यास सुज्ञ नागरिकांनी 1077 या टोल फ्री क्रमांकवर संपर्क साधन्याचे आवाहन सुध्दा प्रशासनाने केले आहे पर्यायाने कोरोनामुक्ति साठी नागरिकांनीच दक्षतेची भूमिका पार पाडुन कोरोनाशी लढा द्यावा व कोरोनावर मात करावी.



0 Comments